आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:बिजरी वाचनालयाच्या वतीने सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा रंगली; परीक्षा व कॅरिअर निवड विषयक मार्गदर्शन शिबिर

धडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बिजरी येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व कॅरिअर निवड विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेकरिता सुमारे २०० वर शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दरवर्षी प्रमाणे ह्या परीक्षेचे नियोजन निसर्गाच्या सान्निध्यात महूच्या झाडाखाली घेण्यात आली. या परीक्षेकरीता तीन गट करण्यात आले. प्राथमिक गटात प्रथम क्रमांक - अंजली किसन पावरा(बिजरी), द्वितीय क्रमांक खुशी अमरसिंग वसावे(काकरपाटी), तृतीय क्रमांक कमलेश जंगलसिंग पटले (बिजरी), सुजल राजेंद्र पटले (बिजरी), माध्यमिक गटात प्रथम क्रमांक गणेश सुभाष वसावे (बिजरी), द्वितीय क्रमांक वर्षा पिंट्या पावरा (भोगवाडे), तृतीय क्रमांक अभिजित दामोदर पावरा (रोषमाळ), तर वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक नीलेश चिणक्या पावरा (बोरद), द्वितीय क्रमांक दिनेश जान्या वसावे (बिजरी), तृतीय क्रमांक राकेश दोहाण्या पावरा (रोषमाळ) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मोहन पावरा (एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज धुळे, सिनेट सदस्य उमवि, जळगाव) होते.

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या गिर्यारहण प्रवासातील अनुभव व यशस्वी मोहिमांबद्दल सांगितले. योगेश मराठे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांत खूप क्षमता असतात. आपली क्षमता ओळखून आपले ध्येय निश्चित करावे असे सांगितले. पोलिस जंगलसिंग वसावे यांनी मनोगत व्यक्त केले.बन्सिलाल वसावे(सैनिक) यांनी देश सिमेवर कर्तव्य बजावतांनाचे अनुभव सांगितले. कार्यक्रमासाठी सोना पटले, सिंगा पटले, चंद्रसिंग पटले, संदिप पटले आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक दिलीप पटले यांनी केले. आभार महेंद्र वसावे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...