आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोगॅस:बायोगॅस  फेरनिविदा; ओला कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात महापालिकेतर्फे कचरा संकलन करण्यात येतो. यात ओला व काेरडा दोन्ही प्रकारचा कचरा संकलित करण्यात येतो. या कचऱ्यावर महापालिकेतर्फे प्रक्रिया करण्यात येते. त्यातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प महापालिका उभारत आहे. याकरिता फेरनिविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामुळे ओला कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे.

महापालिका ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारत आहे. ३० मेट्रिक टन कचऱ्याची क्षमता असलेला हा प्रकल्प असणार आहे. तो प्रकल्प वरखेडी रोडवरील कचरा डेपोच्या आवारात उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता महापालिकेतर्फे निविदा प्रसिद्ध केली होती; परंतु तांत्रिक त्रुटीमुळे त्या प्राप्त निविदा रद्द करण्यात येऊन आता पुन्हा फेर निविदा काढण्यात येणार आहे. यात १ वर्षाकरीता निविदाधारकाला प्रकल्प उभारून तो १ वर्षापर्यंत चालवावा लागणार आहे. तर त्यानंतर ५ वर्षांसाठी देखभाल दुरुस्ती प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकल्पामुळे ओल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

शहरातून दररोज निघतो ७० टन ओला कचरा
शहरातून दररोज कंत्राटारातर्फे कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे. यात ओला व कोरडा कचरा यांचा समावेश आहे. त्यात महापालिका क्षेत्रात हद्दवाढीसह भागातून दररोज सरासरी ७० टन कचरा संकलित करण्यात येतो.

१ हजार ८०० क्युबिक मीटर बायोगॅस निर्मिती
पालिका बायोगॅस प्रकल्प उभारणी करीत आहे. यात ३० टन कचरा क्षमतेचा हा बायोगॅस राहणार आहे. यातून १ हजार ८०० क्युबीक मीटर बायोगॅसची निर्मिती होणार आहे. या बायोगॅसचा उपयोग वीजनिर्मितीसाठी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...