आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक निकाल:धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का, भाजपचे उमेदवार अमरीश पटेल विजयी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या अमरीश पटेल यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटील यांचा पराभव केला

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अमरिश रसिकलाल पटेल (भारतीय जनता पार्टी) विजयी झाले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील यांचा पराभव केला. श्री. पटेल यांना 332, तर श्री. पाटील यांना 98 मते मिळाली. चार मते अवैध ठरली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर, 2020 रोजी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन‍ नियोजन सभागृहात मतमोजणीला सुरवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी, जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे (नंदुरबार) उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो) यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी विजयी उमेदवार श्री. पटेल यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर श्री. पटेल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी उपस्थित होत्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser