आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्य निवडीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात सर्वाधिक ८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. तर पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये नैराश्याचे वातावरण होते.
एकंदरीत मतमोजणी केंद्राबाहेर काही खुशी कही गम असे वातावरण होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला. आज निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच तहसील कार्यालयाबाहेर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. सर्वाधिक जास्त उत्सुकता म्हसावद, पाडळदा व कळंबू ग्रामपंचायतीच्या निकालाबाबत नागरिकांमध्ये होती. तर गावात विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष केला.
विजयी झालेले सरपंच
बहिरपूर- सरपंच मांगीलाल पवार (२३२), जीवननगर- जलाबी वसावे (५३७), निंभोरा - अजय भील (३७०), धांद्रे बु.- सुमन भील (२८१), पाडळदा - मानक सूर्यवंशी (१०७६), कलमाडी- उतऱ्या सुपड्या भील (२२९), कळंबू - रामराव राजाराम बोरसे (१२२९), बिलाडी त.ह.- द्रौपदी विश्राम पवार (२८७), खैरवे भडगाव- तेजस्विनी संदीप गिरासे (६५५), म्हसावद- युवराज उत्तम ठाकरे (२३५४).
केवळ एका मताने विजय
बहिरपूर ग्रामपंचायत येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये रेखा भूषण खेडकर या एकमताने विजयी झाल्या. त्यांनी करुणा चंद्रसिंग चव्हाण यांच्या पराभव केला. खेडकर यांना ७५ तर चव्हाण यांना ७४ मध्ये मिळाली. खैरवे भडगाव ग्रामपंचायत येथील भुरेसिंग वनसिंग सोनवणे यांना २१८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी रणजित पहाडसिंग पवार यांना २१७ मध्ये मिळाली सोनवणे यांनी पवार यांच्या एक मतांनी पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.