आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासधूस:सीतापावलीतील बेघर कुटुंबास भाजपची मदत ; वादळी वाऱ्यांमुळे घराची झाली होती नासधूस

बोरदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत बंधारा अंतर्गत मौजे सीतापावली या गावातील गोविंद तुंबड्या ठाकरे यांच्या घराची वादळी वाऱ्यांमुळे नासधूस झाल्याने भाजपतर्फे या कुटुंबास आर्थिक मदत करण्यात आली. वादळी वाऱ्यांमुळे घराचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले होते. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून आदिवासी मोर्चाच्या वतीने सदर संकटग्रस्त कुटुंबाला ५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत करण्यात आली. आमदार राजेश पाडवी यांनी त्याबाबत आदेश दिले होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी शहादा-तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, आदिवासी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दारासिंग वसावे, शक्ती केंद्र अध्यक्ष विक्रम वळवी, माजी सरपंच जयवंत पाडवी, विजय पाडवी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पाडवी, दारासिंग ठाकरे, हेमशा ठाकरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...