आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकाऱ्यांची बैठक:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज शहरात

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साेमवारी (दि.१२) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सकाळी साडेअकरा वाजता बाइक रॅली निघेल. ही रॅली हॉटेल जलपान रितुराज रिजेन्सीपासून सुरू होईल. तिचा समारोप अग्रवाल भवनात होईल. या ठिकाणी सकाळी साडेअकरा वाजता बैठक होईल. त्यानंतर बावनकुळे यांच्या हस्ते आझादनगर मंडळ भाजप कार्यालयाचे उद्घाटन, युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता नगाव व सोनगीर येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. रात्री दहा वाजता ते नंदुरबारकडे जातील. त्यापूर्वी तैलिक महासभेतर्फे सायंकाळी ६ वाजता पाराेळा राेड पाेलिस चाैकीसमाेर त्यांचा नागरी सत्कार होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...