आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा तालुक्यातील राजविहीर येथील स्थापनेपासून काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपचे आकाश सतीश वळवी यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह नऊ सदस्य दणदणीत विजयी होऊन सत्ता परिवर्तन झाले आहे. ६४ वर्षांनंतर प्रथमच ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. तळोदा तालुक्यातील राजविहीर ग्रामपंचायतची स्थापना १९५९ पासून झाली आहे.
तेव्हा पासून येथे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या पॅनलने याठिकाणी मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गिरीश वखारे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी एस. एन. सरगर यांनी मतगणनेचे काम पाहिले. त्यात भाजपचे सरपंच उषा आकाश वळवी यांच्या विजय झाला तर सदस्यपदी प्रकाश पाडवी, शारदाबाई नाईक, सावित्री वसावे, अंजुबाई पाडवी, चेतन पाडवी, मंगलसिंग पाडवी, गुलाबसिंह पाडवी, सुमनबाई पाडवी, सरला वळवी यांनी दणदणीत विजय मिळवला.
भाजप पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनल तर काँग्रेसचे ग्रामविकास पॅनलमध्ये सरळ लढत होती. भाजपने माजी जि. प. सदस्य सतीश वळवी व माजी पंचायत समिती सभापती आकाश सतीश वळवी यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळवून यश संपादन केले. विजय उमेदवारांनी गावात जल्लोष साजरा केला.
नागरिकांकडून विकासाची संधी
भाजपच्या नेतृत्वात राजविहीर ग्रामपंचायतचे विकास पॅनल निवडून आले आहे. राजविहीर ग्रामस्थांनी एकहाती सत्ता दिल्यामुळे या ठिकाणी विकास करण्याची मोठी संधी आहे. ६४ वर्षांत कधीही झाले नाही अशी कामे याठिकाणी होतील. - राजेश पाडवी, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.