आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:टॅक्स कमी करण्यासाठी भाजपचे आंदोलन; महाविकास आघाडी शासनाच्या प्रतीकात्मक चित्राला मारले चाबकाने फटके

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल, डिझेलवरील अतिरिक्त टॅक्स महाविकास आघाडी सरकार कमी करत नसल्याने नागरिकांचे आर्थिक शोषण होते आहे. त्यामुळे विकास आघाडी शासनाच्या विरोधात भाजप ओबीसी मोर्चातर्फे चाबूक मारो आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने इंधनावरील टॅक्स कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलवरील अतिरिक्त टॅक्स कमी करून दर संतुलित ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गोव्यात पेट्रोलचे दर ९७ रुपये, मध्य प्रदेश, उत्तराखंड व उत्तर प्रदेशात १०५ रुपये लिटर पेट्रोल आहे. मात्र, केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार जनतेचे आर्थिक हाल करत आहे. जादा अधिभार लावून पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्यात आले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा दर १२० रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेला आहे. महाविकास आघाडी सरकारने टॅक्स कमी करून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण थांबवावे. या वेळी महाविकास आघाडीच्या प्रतीकात्मक चित्राला चाबकाचे फटके मारण्यात आले. आंदोलनात भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल, विक्की परदेशी, रमेश करनकाळ, मनोज पिसे, किशोर थोरात, बबन चौधरी, रोहित चांदोडे, विनोद खेमणार, सुरेश अहिरराव, प्रमोद चौधरी, प्रकाश गवळे, किरण चौधरी आदी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...