आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाच आमदार निवडून आले. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पुन्हा भाजपची सत्ता येण्याची चिन्ह निर्माण झाल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदही व्यक्त केला.
शहरातील गुरूशिष्य स्मारकांसमोर भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी आनंदोत्सव साजरा झाला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले. खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर अनिल नागमोते, नगरसेवक हिरामण गवळी, अमोल मासुळे, विजय पाच्छापुरकर, महादेव परदेशी, चंद्रकांत गुजराथी, यशवंत येवलेकर, जयश्री अहिरराव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माया परदेशी, मंगला कवडीवाले, सुनीता सोनार, युवराज पाटील, हिरामण चौधणी, अनिल थोरात, विजय पवार, सागर कोडगीर, पवन जाजू, सनी चौधरी, बबन चौधरी, अजय अग्रवाल, प्रदीप पानपाटील, सुनील बैसाणे, महादेवी परदेशी, जीवन शेंडगे, किशोर जाधव, अॅड. किशोर जाधव, रमेश करनकाळ, प्रिया कपोले, मंजुषा लोहारेकर आदी उपस्थित होते. या वेळी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.