आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील प्रभाग क्रमांक ६ मधील एका जागेसाठी रविवारी पोटनिवडणुकींतर्गत मतदान झाले. त्यानंतर सोमवारी मतमोजणी झाली. प्रतिभा योगेश माळी यांचा भाजपच्या रुखसानाबी कसाई यांनी २९४ मतांनी पराभव केला.
येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मधील सदस्या जायदाबी शे.हकीम कसाई यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली. एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. रुखसानाबी कसाई यांनी ७७३ मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रतिभा योगेश माळी यांना ४७९ मते मिळाली. जायदाबी शेख हमीद कसाई यांना ४२ मतांवर समाधान मानावे लागले. विजयी रुखसानाबी कसाई या हाजी अल्ताफ कुरेशी यांच्या पत्नी आहे.
निवडणूक निकालानंतर अकबर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, सरपंच रुख्माबाई ठाकरे, उपसरपंच प्रतिनिधी धाकूशेठ बडगुजर, राजेंद्र जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामलाल मोरे, डॉ.मनुकुमार पटेल, मनोहर धनगर, श्याम माळी, निखिल परदेशी, मोहनसिंग परदेशी, दिनेश देवरे, साहेबराव बिरारी, भटू धनगर, हाजी शकील कुरेशी, अहेमद खान पठाण, कलीम कुरेशी, सुदन कासार, महेंद्र भोई, अरुण मोरे, संतोष धनगर, शाना धनगर, नाजीम कुरेशी, पप्पू कुरेशी, साबीर अली सय्यद, वशीम फकीर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.