आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:भाजपच्या विजयाचा दोंडाईचात जल्लोष; भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल यांच्या चाणक्य नीतीचा विजय

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल यांच्या चाणक्य नीतीचा विजय झाल्याने दोंडाईचा शहर भाजपतर्फे स्वागत करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष नारायण पाटील व शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांच्या नेतृत्वाखाली चौकाचौकात फटाके वाजवून व मिठाई वाटप करत प्रचंड जल्लोष साजरा केला. या प्रसंगी लोकनेते सरकारसाहेब रावल, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, संघटन जिल्हा सरचिटणीस डी.एस. गिरासे माजी नगरसेवक निखिल जाधव, जितेंद्र गिरासे, जितू गिरासे, विजय मराठे, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, संजय तावडे, पंकज चौधरी, शैलेश बोरसे, अनिल सिसोदिया, संजय पाटील, अशोक चौधरी, रफिक शाह, वसंत चव्हाण, चंद्रकला सिसोदिया, इंदिरा रावल, भगवान बडगुजर, विराज गिरासे, बापू तमखाने, संजय चौधरी, वीरेंद्र गिरासे, राकेश अग्रवाल, सुनील शिंदे, कृष्णकांत घोडके, श्रीकांत सराफ, दीपक नागरे, दीपक सोनवणे, के. पी गिरासे, देविदास पाटील, नाना तोताराम पाटील, राजू धनगर, हरीश आव्हाड, चतुर पाटील, मयूर राजपूत, महेंद्र महाजन, भूषण अहिरे, ताराचंद बागुल, सागर गिरासे उपस्थित होते.