आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:अर्पण ब्लड बँकेत रक्तदान शिबिर; रक्तदान दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर संस्थेच्या शिबिरात अनेकांचे रक्तदान

धुळे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तदान दिनानिमित्त देवपूरातील त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय संस्थेतर्फे अर्पण ब्लड बँकेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुलोचना चौधरी उपस्थित होत्या.

शिबिरात पोलिस प्रशिक्षण केंद्राचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, रामकृष्ण पवार, डॉ. अनिल भामरे आदींनी रक्तदान केले. डॉ. अनिल भामरे, रामकृष्ण पवार यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. ओ निगेटिव्ह रक्त मिळण्यास अनेकादा अडचण येते. या गटाच्या रक्ताची गरज असल्यास रक्तदान करण्यासाठी तयार असल्याचे पवार यांनी सांगितले. टीना काळे, राजेंद्र चौधरी, डॉ. आरती चव्हाण, इंगळे, अर्पण ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...