आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे‎ आज रक्तदान शिबिर‎

धुळे‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या‎ साेमवारी (दि.१२) रक्तदान शिबिर‎ होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद‎ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा‎ उपक्रम होणार आहे. पक्षाचे प्रदेश‎ उपाध्यक्ष अनिल गाेटे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष‎ तेजस गाेटे यांच्या संकल्पनेतून‎ राष्ट्रवादी भवनात हे शिबिर होणार‎ आहे. शिबिरात पक्षाच्या‎ कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना‎ सन्मानचिन्ह, पेन ड्राइव्ह भेट देण्यात‎ येणार आहे. तसेच दुपारी ३.३०‎ वाजता स्वाभिमान सप्ताहानिमित्त‎ महिला आघाडीच्या सुरेखा नांद्रे‎ यांच्या निवासस्थानी अनमोल नगर,‎ प्लॉट क्रमांक सात महिला‎ महाविद्यालयाजवळ भारतीय‎ संविधान याविषयावर व्याख्यान‎ होणार आहे. अॅड. धनश्री, अॅड.‎ नूतन पाटील मार्गदर्शन करतील.

‎ तसेच फातेमा अल्पसंख्याक‎ सामाजिक संस्थेर्फे सकाळी ११‎ वाजता आग्रा राेडवरील एल. एम.‎ सरदार शाळेसमाेर गल्ली नं. सहा‎ येथे रक्तदान शिबिर होणार आहे. या‎ कार्यक्रमाचे आयाेजन कार्याध्यक्ष‎ अजहर पठाण यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...