आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी यांच्यातर्फे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकाच दिवसात २७० जणांनी रक्तदान केले.
शहरातील हिरे मेडिकल काॅलेजसह सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिर घ्यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील कानुश्री मंगल कार्यालयात हे शिबिर झाले. शिबिरात हिरे मेडिकल काॅलेजने ६१, नवजीवन रक्तपेढीने ६५, जनसेवा रक्तपेढीने ७७, जीवनज्याेती रक्तपेढीने ३६, अर्पण रक्तपेढीने ३१ रक्त पिशव्या संकलित केले. या शिबिरामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल साेनवणे, संघटक भगवान करनकाळ, किरण जाेंंधळे, पंकज गाेरे, शानाभाऊ साेनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील, माजी आमदार शरद पाटील, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.