आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:धडगावला १५० दात्यांचे  रक्तदान

धडगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

९ ऑगस्ट या विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद व येथील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन शाखा यांच्यामार्फत रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास १५० दात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी माडा व धुळे येथील निर्णय जनसेवा ब्लड सेंटर यांच्या टीम उपस्थित होत्या.

येथील माेलगी राेडवरील सिकलसेल दवाखान्यात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यात तालुक्यातील दात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन येथील महाराज ज.पो. महाविद्यालयाचे प्राचार्य एच.एम. पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जर्मनसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला टी शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चहापानाचीही व्यवस्था करण्यात आली हाेती. महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे डॉ.राजेंद्र पाडवी, डॉ.दिलीप वळवी, डॉ.जयसिंग पाडवी, डॉ.राकेश पावरा, डॉ.गणेश पावरा, आयाेजक आदिवासी एकता परिषदेचे राजू पावरा, के.के. पावरा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...