आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीर:धाडरी येथील आरोग्य शिबिरात 186 महिला अन् युवतींची रक्त तपासणी

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक फाऊंडेशन धाडरी व आर्वी तसेच भारत विकास परिषद धुळे शाखा यांच्या तर्फे हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप शिबीर धाडरी येथे घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप बद्दल महिला व मुलींना सगळी माहिती देण्यात आली. हिमोग्लोबिन कमी झाल्यास काय परिणाम होऊ शकतात, ते कसे वाढविले जाते, ब्लड ग्रुप माहित असणे कशासाठी महत्वाचे असते. त्याबद्दल माहिती डॉक्टर प्राची ध. शुक्ल यांनी दिली. महिलांच्या विविध आजारांबाबत कन्सलटेशन, उपचारांचे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास विवेक फाउंडेशन धाडरीचे अध्यक्ष रामलाल जैन, धाडरी गावातील विशेष अतिथी, भारत विकास परिषद धुळे शाखा अध्यक्ष राजेंद्र जाखडी, धुळे जिल्हा समन्वयक सागर देशपांडे, धुळे जिल्हा महिला समन्वयक डॉ.प्राची ध.शुक्ल, श्रीराम पॅथॉलाजीचे धनंजय शुक्ल व सहकारी टीम व सुनिल कपिल आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण १८६ महिला व मुलींची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सोबत काळे फुटाणे,व गुळ देण्यात आला. ज्या महिलांचे हिमोग्लोबिन खूप कमी असणार त्यांना औषधी देण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...