आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बंबच्या पोलिस कोठडीची पुन्हा होऊ शकते मागणी; सोमवारी न्यायालयात कामकाज

धुळे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या सोमवारी संपते आहे. इतर गुन्ह्यात त्याला पुन्हा पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली जाऊ शकते. याविषयी उद्या सोमवारी न्यायालयात कामकाज आहे.

राजेंद्र जीवनलाल बंब याच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यापैकी आर्थिक गुन्हे शाखेकडे मूळ तक्रार, आझादनगर पोलिस ठाण्यात दोन तर शहर व देवपूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. गणेश गवळी यांच्या तक्रारी प्रकरणी राजेंद्र बंब पोलिस कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत उद्या सोमवारी संपेल. त्याला इतर गुन्ह्यात अटक केली जाऊ शकते. त्यासाठी आझाद नगर, शहर अथवा देवपूर पोलिस अर्ज दाखल करू शकतात. दरम्यान, विलास ताकटेंच्या तक्रारीनंतर बंबतर्फे दाखल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

बातम्या आणखी आहेत...