आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:लसीकरण टाळत मेंढपाळांच्या‎ हातात दिल्या लसींच्या बाटल्या‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेंढ्यांना पीपीआर लस द्यावी या‎ मागणीसाठी ठेलारी महासंघाने‎ आंदोलन केले हाेते. त्यानंतर पशुसंवर्धन‎ विभागाने लसीकरण करत असल्याचा‎ आव आणला. प्रत्यक्षात लसीकरण न‎ करता मेंढपाळांच्या हातात लसीच्या‎ बाटल्या दिल्या. या प्रकरणाची चौकशी‎ करावी, अशी मागणी ठेलारी महासंघाने‎ केली आहे.‎ जिल्ह्यासाठी १२ ऑक्टोबरला २‎ लाख १२ हजार १०० पीपीआर लस‎ उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे तातडीने‎ लसीकरण करण्यात यावे या‎ मागणीसाठी ठेलारी महासंघाचे अध्यक्ष‎ शिवदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली‎ आंदोलन करण्यात आले.

या वेळी‎ पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी‎ सौजन्याने बोलण्याचीही तसदी घेतली‎ नाही. त्यामुळे ठेलारी महासंघाने १४‎ ऑक्टोबरपर्यंत लसीकरण झाले नाही‎ तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला‎ होता. तसेच २७ ऑक्टोबरला जिल्हा‎ परिषदेच्या बाहेर आंदोलन केले होते. या‎ वेळी पशुसंवर्धन विभागाने ८६ हजार‎ १९० मेंढ्यांचे लसीकरण केल्याचे खोटे‎ आकडे दाखवले.

चौकशी आणि‎ कारवाई टाळण्यासाठी पीपीआर लस‎ मेंढ्यांना न देता लसीच्या बाटल्या‎ मेंढपाळांच्या हातात दिल्या. मुळात या‎ लस योग्य तापमानात ठेवणे आवश्यक‎ आहे. लस मेंढपाळांना देणे चुकीचे‎ आहे. त्यामुळे या प्रकरणी दोषी‎ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी‎ अशी मागणी ठेलारी महासंघाचे‎ शिवदास वाघमोडे, अण्णा सूर्यवंशी,‎ लक्ष्मण ठेलारी, ज्ञानेश्वर ठेलारी,‎ सावकार ठेलारी आदींनी केली आहे.‎ याबाबत जिल्हा परिषदेच्या‎ मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन‎ देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...