आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बॉक्सिंग खेळाडू तरुणी अपघातात ठार

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणापासून जवळ असलेल्या गोराणे फाट्याजवळ भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिली. दाेघे खेळाडू जखमी झाले. त्यापैकी महिला बॉक्सिंगपटू अंजली गवळे हिचा उपचार घेताना दुर्दैवाने मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.शहरातील गोपाळ नगरातील रहिवासी असलेली अंजली नारायण गवळे (वय १८) ही तरुणी बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी शिरपूरला निघाली होती. तिच्यासोबत अन्य एक खेळाडू देखील होती.

गोराणे फाट्याजवळ त्यांना भरधाव वेगातील कारने धडक दिली. यात दोघे जखमी झाले. या दोघांवर देवपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अंजली हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने नोंद करण्यात आली आहे. तर घटनेची कागदपत्रे नरडाणा पोलिसांना पाठवण्यात आली आहे.

अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत अंजलीच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. घटनेबद्दल बुधवारी सायंकाळ पर्यंत नरडाणा पोलिसांत नोंद झाली नव्हती. तिच्या अपघाती मृत्यूने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...