आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी. फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर:शिरपूरचे बी फार्मसीचे विद्यार्थी विद्यापीठात

शिरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बी. फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत येथील आर. सी. पटेल फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात स्थान मिळवले. चतुर्थ वर्ष बी. फार्मसीमध्ये आकांक्षा महाजन ९.४४ सीजीपीए, भाग्यश्री मराठे ९.४४, निखिल पाटील ९.४३, दत्तात्रय कायंदे ९.४३ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. नीलेश कुरकुटे ९.३३, दीपक पाटील ९.२९, वैष्णवी पाटील ९.२७ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात अनुक्रमे सहावा, सातवा, आठवा, परेश बडगुजर, रुचिता जाधव, कोमल सिंधी या सर्वांनी ९.२६ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात अनुक्रमे नववा, दहावा, अकरावा व महाविद्यालयातून अनुक्रमे आठवा, नववा, दहावा क्रमांक प्राप्त केला.

तृतीय वर्ष बी. फार्मसीमध्ये कुलदीप पाटील ९.७२ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठात व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. यशोमाला चौधरी ९.६५, चेतन भट ९.६२, गायत्री शेजूळ ९.६०, नीलिमा चौधरी व मयूर पाटील यांनी प्रत्येकी ९.५८, चेतन माळी ९.५७, रेणुका टेहळे ९.५३, निशा गोरे ९.५१, मयूर पाटील ९.४९, राज सोनवणे ९.४४ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम ते दहावा क्रमांक प्राप्त केला. द्वितीय वर्ष बीफार्मसी मध्ये अभिजित जाधव ९.७० सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. श्वेता चौधरी ९.६८ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयात द्वितीय क्रमांक, प्रेरणा परमार, हेमांगी महाजन, सौरभ बोरसे, कामिनी भदाणे यांनी ९.६६ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयातून तृतीय तसेच युक्ता बडगुजर, रिना माळी यांनी ९.६४ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयातून चतुर्थ क्रमांक पटकावला. अक्षदा चौधरी ९.६३ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयातून पाचवा, दर्शना शर्मा, रुतुजा पाटील ९.६२ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयातून सहावा क्रमांक पटकावला. प्रथम वर्ष बी. फार्मसीतून यश ठोके व मयुरेश पाटील यांना अनुक्रमे ९.५७ व ९.५५ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यापीठ व महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. प्रदीप शार्दूल याने विद्यापीठात पाचवा व महाविद्यालयात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...