आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:लाचखोर वनपालाची पोलिस कोठडीत रवानगी; 15 हजारांची मागितली होती लाच

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​वाहन सोडवण्यासाठी १५ हजारांची लाच मागणारया वनपाल सुनिल पाटील यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसे निर्देश न्यायालयाने बुधवारी दिले.

देवपुर दत्त मंदरी परिसरातील वृक्षतोडी नंतर निघालेले लाकूड मोजणीसाठी वाहनातून नेले जात होते. हे वाहन वनविभागाने अडवून जमा केले होते. वाहन सोडण्यासाठी वनपाल सुनिल आधार पाटील ( वय ५७) यांनी १५ हजारांची मागणी केली होती. याबबात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर काल मंगळवारी सुनिल पाटील यांना अटक करण्यात आली होती. शिवाय आझाद नगर पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...