आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाचे काम:निमदर्डाजवळील पूल २ दिवसांत गेला वाहून ;१० गावांतील शेतकरी, विद्यार्थ्यांना फटका

नवापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने गावकऱ्यांसाठी पर्यायी कच्चा पूल तयार करण्यात आला होता. दरम्यान वरील डोंगराळ भागात पाऊस झाल्याने निमदर्डा गावाजवळ असलेला पर्यायी मातीचा कच्चा पूलही पहिल्याच पुरात वाहून गेल्याने परिसरातील १० गावांची दळणवळणासाठी मोठी गैरसोय झाली आहे.

मोठ्या पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट करून बंद केले होते. पावसाळ्यात पर्यायी पूल वाहून गेला. पुन्हा तयार केला तर तोही वाहून गेला. पर्यायी पूल तयार केला जात असताना नागरिकांनी काम मजबूत करण्याची मागणी केली हाेती; परंतु निकृष्ट काम करून पळ काढल्याने देवळीपाडा, निमदर्डा, मोतीझिरा, पांढरफळी, पाटीलफळी, वागदी आदी १० गावांचे दळणवळण विस्कळीत झाले आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली.

बातम्या आणखी आहेत...