आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:बसपाचे मत भाजपला; उपमहापौरपदी बोरसे 50 मत मिळवत सहज विजयी

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपमहापौरपदी भाजपचे नागसेन बोरसे यांची निवड झाली. त्यांना ५० मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार तथा अपक्ष नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल यांना २० मते मिळाली. निवड प्रक्रियेत बसपच्या नगरसेविकेने भाजपचे बोरसे यांना मत दिले. सभेला तीन नगरसेवक गैरहजर होते. महापालिका सभागृहात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया झाली.

भाजपचे नागसेन बोरसे, अपक्ष मोमीन आसिफ इस्माईल व एमआयएमचे नगरसेवक सईद बेग यांचे अर्ज छाननीत वैध ठरले. त्यानंतर सईद बेग यांनी माघार घेतली. त्यामुळे बोरसे व मोमीन आसिफ रिंगणात होते. हात उंचावत मतदान झाले. भाजपचे बोरसे यांना ५० मते मिळाली. त्यात बसपच्या एका मताचा समावेश होता. मोमीन इस्माईल यांना २० मते मिळाली.भाजपच्या आरती पवार, काँग्रेसचे सुभाष जगताप, शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील हे गैरहजर होते.

लढाई सुरूच राहणार
भाजपने दिलेल्या संधीचे सोने केले जाईल. विकास कामांना सहकार्य असेल. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेली लढाई पुढेही सुरूच राहील. कारण भ्रष्टाचार खपवत नाही.-नागसेन बोरसे, उपमहापौर, मनपा

बातम्या आणखी आहेत...