आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दंडेवाले बाबा नगरातील‎ खुल्या जागेला भिंत बांधा‎

धुळे‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील माेहाडी उपनगरातील‎ दंडेवाले बाबा नगरातील खुल्या‎ जागेला संरक्षण भिंत बांधावी. तसेच‎ या ठिकाणी पथदिवे बसवावे, अशी‎ मागणी अजय गर्दे यांनी केली आहे.‎ याविषयी त्यांनी स्थायी समिती‎ सभापती किरण कुलेवार यांना‎ निवेदन दिले.‎ मोहाडी उपनगरातील दंडेवाले‎ बाबा नगरातील सिटी सर्व्हे क्रमांक‎ डी ६१/१४७ मध्ये महापालिकेची‎ दोन ठिकाणी मोकळी जागा आहे.‎

या जागेच्या आजूबाजूला अनेक घरे‎ आहे. तसेच परिसरात पथदिवे‎ नसल्याने रात्री अंधार असतो.‎ त्यामुळे पथदिवे लावावे, तसेच‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मारुती मंदिरासमोर नरेंद्र पाटील‎ यांच्या घराच्या शेजारी व नारायण‎ बाबूराव लोहार यांच्या घराजवळ‎ माेकळी जागा आहे. या जागेला‎ संरक्षण भिंत बांधावी. या ठिकाणी‎ उद्यान विकसित करावे, ज्येष्ठ‎ नागरिकांना बसण्यासाठी सोय‎ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे‎ करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...