आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र धूर:सरावासाठी फोडल्या अश्रुधूर नळकांड्या; नागरिक त्रासले

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सरावासाठी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अश्रुधूराच्या १०० नळकांड्या फोडल्या. त्यामुळे सर्वत्र धूर झाला. किमान दोन किलोमीटर परिसरातील नागरिकांना डोळे चुळचुळणे, मळ मळणे आदी त्रास जाणवला. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांचा सराव सुरू होता. या वेळी दंगा नियंत्रणाचा सराव करताना सुमारे १०० अश्रुधूराचे नळकांडे फोडण्यात आले.

त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत, बारा पत्थर चौक, बसस्थानक, फाशीपुल, स्टेशन रोड आदी दोन किलोमीटर अंतरावरील नागरिकांना डोळे चुळचुळणे, मळमळ, डोकेदुखी आदी त्रास झाला. सायंकाळी सात वाजेपर्यंत नागरिकांना त्रास जाणवत होता. पोलिसांनी फोडलेल्या सर्व नळकांड्याची मुदत संपली होती, अशी माहिती पोलिसांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. सुमारे सहा वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने अश्रुधूराचे नळकांडे फोडल्यामुळे नागरिकांना त्रास झाला होता.

बातम्या आणखी आहेत...