आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरताड शिवारात शुक्रवारी सकाळी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. बसचालक महेंद्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत एका कंटेनरवर मागून बस धडकवली. त्यामुळे अनर्थ टळला. औरंगाबादहुन शुक्रवारी सकाळी ६ वाजता निघालेली शिंदखेडा बस (एमएच-१४-बीटी-१८५४) धुळ्याकडे येत असताना गरताडजवळ बसचा ब्रेक फेल झाला. या वेळी चालक महेंद्र मगन पाटील यांनी प्रसंगावधान राखत बसच्या वेगावर नियंत्रण मिळवले. तसेच एका कंटेनरवर ही बस मागून आदळवली.त्यामुळे अनर्थ टळला.
अपघातात जखमी झालेले प्रवासी अपघातात चालक महेंद्र मगन पाटील, सुरेश नवसूर एकतार, नीलम भोसले, नानाजी भोसले, संतोष पाटील, राज चव्हाण, झेनम मुर्तजा, राहुल पाटोळे, हिरामण पाटील, हेमंत पाटील, जनम सायीवाला, छाया ठाकरे, पाथर्वी ठाकरे, प्रभावती पाटील, संगीता वराडे, कमलबाई पाटील हे जखमी झाले. त्यांना हिरे रूग्णालयात नेले.
२४ तासात ४ अपघात ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला. त्या ठिकाणी २४ तासात ४ अपघात झाले. एका अपघातात गुरुवारी ट्रॉलाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात आशिष रवींद्र देसले (वय. ३२, रा. देवपूर) हा जखमी झाला. त्यानंतर गुरुवारीच भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे गारशीलाल दीपाली सोनानी, दिनेश शिकाऱ्या रावत हे जखमी झाले. त्यानंतर सायंकाळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मिथून फुलसिंग वळवी, राहूलसिंग वळवी जखमी झाले. पुन्हा शुक्रवारी बसचा अपघात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.