आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निजामपूर:निजामपूरहून धुळे, औरंगाबाद बससेवा कार्यरत

निजामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निजामपूर येथून धुळे व औरंगाबादसाठी बस सुरू करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली होती. त्यानुसार धुळे व औरंगाबादसाठी बससेवा सुरू झाली आहे. साक्रीचे आगारप्रमुख किशोर महाजन यांच्या उपस्थितीत धुळे बस सोडण्यात आली.

निजामपूर-जैताणे बाजारपेठेचे गाव आहे. परिसरातील अनेक लहान गावे या गावाला जोडली आहे. निजामपूर लामकानी, बोरीस, सरवड मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून एकही बस उपलब्ध नव्हती. पर्यायाने या भागातील प्रवाशांना साक्रीला जाऊन धुळ्याला जावे लागत होते. त्यामुळे वेळ व पैसा दोघांचा अपव्यय होत होता. या मार्गावर बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साक्री-औरंगाबाद बस साक्री येथून सकाळी ६.३० वाजता निघेल. ती निजामपूर येथे ७ वाजता येऊन लामकानी, सरवड, धुळे मार्गे १२.५० वाजता औरंगाबाद येथे पोहोचेल. औरंगाबाद येथून परत दुपारी १.३० बस सुटेल. ती सरवड मार्गे सायंकाळी ७.५० वाजता पोहोचेल. तसेच साक्री-धुळे बस सकाळी ८ वाजता साक्री येथून निघेल. निजामपूर, लामकानी, सरवड मार्गे १०.५० वाजता धुळे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही बस धुळे येथून ११.१५ वाजता निघेल व सरवड, लामकानी, निजामपूर, साक्री येथून २.३५ वाजता पिंपळनेरला जाईल. पिंपळनेर येथून धुळे बस दुपारी ११.१५ वाजता निघेल. साक्री, निजामपूर, लामकानी मार्गे धुळे येथे दुपारी २.३५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही बस दुपारी ३.०० वाजता धुळे येथून निघेल व निजामपूर मार्गे ५.५० वाजता पोहोचेल अशी माहिती साक्री आगार प्रमुख किशोर महाजन यांनी दिली. निजामपूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडित मुरलीधर बदामे, माजी सरपंच नंदकुमार विसपुते, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी रघुवीर खारकर, जगदीश शाह, मधुकर बधान, डॉ. रमाकांत शिरोडे, ईश्वर सोनवणे, अजितचंद्र शाह, सतीश राणे, वासुदेव बदामे, सखाराम विसपुते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...