आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेंडाईचा आगारप्रमुखाचा सत्कार:विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी बस सुरू; आता राेज शाळेला जाता येणार

सारंगखेडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील कळंबू येथील दादासाहेब गुलाबराव बोरसे शेतकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातर्फे निंभाेरा येथील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करून अडचण दूर केल्याबद्दल दोंडाईचा बस आगारप्रमुखांचा सत्कार केला.

मातकूट, बोराळे, जयनगर, निंभोरा, धांद्रे येथील शेकडाे विद्यार्थी रोज कळंबू शाळेत येतात. परंतु बस सेवा सुरू नसल्याने त्यांची शाळेत येताना-जाताना माेठी गैरसोय होत होती. खाजगी वाहने अथवा दुसरे कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट असल्याने शाळेत जाणे अवघड झाले होते. कळंबू ते निंभोरा हे १० ते १२ कि.मी. अंतर पायी किंवा सायकलीवर येण्या-जाण्यास अनेक अडचणी येत होत्या.

यावर कळंबू येथील शिक्षकांनी पुढाकार घेत दोंडाईचा बस आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगून विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी बस सुरू करण्याची मागणी केली. वस्तुस्थिती लक्षात घेत मागणीस दोंडाईचा येथील एस.टी. आगार प्रमुख अनुराधा राजाराम चौरे यांनी मान्यता दिली. शाळेच्या वेळेनुसार बसची सोय करून विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर केला.

दरम्यान बस सुरू झाल्याने खेड्यापाड्यातील नागरिक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्याबद्दल आगारप्रमुख अनुराधा चाैरे यांच्यासह त्यांचे सहकारी वाहतूक निरीक्षक निखिल पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक निखिल पाटील व वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण कोळी यांचाही शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सत्कार केला. यावेळी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.एम.ए. चौधरी, शिक्षक आर.एस. कोंटूरवार, व्ही.एस. बागुल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...