आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणू:ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक; दोंदवाड ग्रामपंचायतीत बनसोडे तर निमगूळला पाटील यांचा विजय

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यानंतर सोमवारी मतमोजणी झाली. दोंदवाड येथे जनाबाई बनसोडे यांनी तीन मतांनी विजय मिळवला. निमगूळला शीतल पाटील विजयी झाल्या.

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी तीन ग्रामपंचायतींच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या. सोनगीर, निमगूळ आणि दोंदवाड येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी झाली. सकाळी दहा वाजता तिन्ही जागांचे निकाल जाहीर झाले. दोंदवाड येथे दोन उमेदवार रिंगणात होत्या. या ठिकाणी जनाबाई बनसोडे यांनी ११८ मते मिळवत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी अशोक माळी यांना ११५ मते मिळाली.

निमगूळ येथील एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. कविता मराठे यांना २०७ मते तर शीतल पाटील यांना ३९९ मते मिळाली. शीतल पाटील विजयी झाल्या. निमगूळ येथील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. या वेळी डॉ. नवज्योत पाटील, साहेबराव मराठे, नवीन मोरे, प्रदीप सोनवणे, मिलिंद बोरसे, बाळू पाटील, दीपक सूर्यवंशी, पवन मोरे, प्रदीप देवरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...