आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​गौराईचे आगमन:आज सकाळी 9 ते रात्री 9 करा गौराईंचे आवाहन ; बाजारात खरेदीसाठी गर्दी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर आता गृहिणींना वेध लागले आहेत ते श्री महालक्ष्मी (गौरी) आवाहनाचे. ३ सप्टेंबरपासून ज्येष्ठा गौरींचे आगमन होत आहे. शनिवारी अनुराधा नक्षत्रात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत गौरीचे आवाहन करता येणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत या सणाच्या खरेदीसाठीही नागरिकांची लगबग वाढली आहे. स्टील आणि लोखंडाचे भाव वाढल्याने यंदा कोठ्यांच्या किमती वाढल्या आहेत. महालक्ष्मीचे मुखवटे, मखर साज बाजारात आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवट्यांच्याही किमती यंदा वाढल्या आहे.

लोखंड व स्टीलचे दर वाढल्याने पीओपीच्या मुखवट्यांना मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी सुंदर लक्षवेधक मुखवटे बाजारात विक्रीसाठी ठेवले आहे. बाजारात लोखंडी धातूच्या कोठ्या, स्टीलच्या कोठ्याही विक्रीस आहे. गौराईसाठी मुखवटे, कंबरपट्टा, बाजूबंद, नथ, कर्णफुले, माळा हे दागिने तसेच आरास करण्यासाठी विविध वस्तू उपलब्ध असल्याचे विक्रेत्याकडून सांगण्यात आले.

तीन दिवस असे केले जाते गाैरीचे पूजन
बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. कोठ्यांवर मातीचा मुखवटा चढवला जातो. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात. तीन दिवस त्यांचे मनोभावे पूजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...