आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअन्य धर्मांचे आचरण करणाऱ्या आदिवासींच्या सवलती रद्द करा, ज्या आदिवासी लोकांनी आपल्या पूर्वजांच्या रूढी, परंपरा, पूजा पद्धती, संस्कृती सोडून दिली आहे व अन्य धर्मांच्या पूजा पद्धतीचे आचरण करायला सुरुवात केली आहे, अशा लोकांना आदिवासी संस्कृतीमधून किंवा आदिवासींच्या नावाखाली मिळणाऱ्या सवलती, आरक्षण रद्द कराव्या, अशी मागणी जनजाती सुरक्षा मंचचे अॅड.हिंमत तावडे यांनी या आदिवासी महासंमेलनात केली. येथील बसस्थानकापासून ते वामन बापू मंगल कार्यालयापर्यंत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत ढोलाच्या तालावर रॅली काढली. येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात शनिवारी जनजाती सुरक्षा मंच अंतर्गत या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय टीम सदस्य व देवगिरी कल्याण आश्रमाचे संयोजक डॉ.विशाल वळवी, देवल्या महाराज, क्षेत्रीय सहसंघटन मंत्री गणेश गावित, सहसचिव देवगिरी प्रांत वीरेंद्र वळवी, देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष गिरीश वसावे, रजूबाई पावरा, कल्पना पाडवी आदी उपस्थित होते. अॅड.तावडे म्हणाले की, जनजाती सुरक्षा मंच अंतर्गत हे आदिवासी महासंमेलन, मोर्चे अशी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात व देशभरात राबवण्यात येत आहे. त्याचा उद्देश असा आहे की, देशातील जनजाती समाजातील काही ठिकाणी आदिवासी लोकांनी ख्रिश्चन, मुस्लिम असे धर्मांतर केले आहे. हे लोक दोन्ही ठिकाणी घरकुलापासून एमबीबीएसच्या उच्च शिक्षणापर्यंत लाभ घेतात. तुम्ही एकाच ठिकाणी लाभ घ्या. इकडे घ्या किंवा तिकडे घ्या. आदिवासी लोकांना आपली संस्कृती टिकवू द्या. ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांनी आदिवासी संस्कृतीचे परंपरेचे जतन करण्याचे कार्य बंद केले आहे. या विषयावर संविधान कलम ३४२ नुसार संशोधन करून अशा लोकांच्या लिस्टिंग तयार करून त्यांना आदिवासींच्या नावावर मिळणारे फायदे, आरक्षण रद्द करावे व जे लोक याहामोगी मातेला मानत नाही, अशा लोकांना आदिवासी म्हणण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.