आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त ६७३ पदांसाठी एमपीएससीद्वारे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी ४ जून रोजी होईल. २ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, २२ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येतील. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गत वर्षापासून शासनाने एमपीएससीद्वारे भरल्या जाणाऱ्या वरिष्ठ पदांची भरती सुरू केली आहे. ४५ वर्षांपर्यंतच्या उमेदवाराला ही परीक्षा देता येणार आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांतील एमपीएससीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांसाठी एमपीएससीकडून वारंवार पाठपुरावा करून तपशील मागवला जात असून, त्याअंतर्गत आता ६७३ पदांचीमेगा भरती केली जाणार आहे. त्यातील राज्यसेवा गट ‘अ’ आणि गट ‘ब’च्या तब्बल २९५ पदांचा समावेश आहे. तर मुख्यपरीक्षेच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या असून, अधिक माहितीसाठी https://mp sconline.gov.in आणि https:mpsc.gov.in आयोगाच्या संकेतस्थळावर भेट देता येईल.
आॅनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची व्यवस्था केली जाईल. आठ हजार पदांसाठी पूर्व परीक्षा एमपीएससीतर्फे राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत येणाऱ्या ८१६९ पदांची भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ३० एप्रिलला परीक्षा हाेईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही माेठी संधी आहे. दरम्यान, गुरूवारी पहिल्याच दिवशी अनेकांनी अर्ज भरण्यास प्राधान्य दिले होते.
अशी आहे वयाेमर्यादा, अटी
उपजिल्हाधिकारी पदांसाठी १ एप्रिल २०२३ ही कटआॅफ डेट आहे. इतर पदांसाठी १ जून २०२३ ही कटआॅफ डेट निश्चित केल आहे. या दिवसांपर्यत संवर्गनिहाय उमेदवारांचे वय असे असावे. किमान १८ वर्षे पूर्ण असावे. कमाल वय : खुला-(३८ वर्षे), मागासवर्गी य -आ.दु,घ. -अनाथ ( ४३ वर्षे), प्रावीण्य प्राप्त खेळाडू - खुला (४३ वर्षे), मागासवर्गीय-४३ वर्षे), माजी सैनिक यांना ४३ वर्षे तसेच दिव्यांगांना ४५ वर्षांपर्यंत परीक्षा देता येईल.
राज्यसेवा गट ‘अ’ व गट ‘ब’
राज्यसेवा गट अ, ब २९५ पदे (उपजिल्हाधिकारी ९ पदे) ( मुख्य परीक्षा ७, ८ व ९ आॅक्टोबर २०२३), महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ आणि ब १३० पदे (मुख्य परीक्षा १४ आॅक्टोबर २०२३) महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब १५ पदे (मुख्य परीक्षा १४ आॅक्टोबर २०२३), निरीक्षक वैधमापन शास्त्र गट ब ३९ पदे ( मुख्य परीक्षा २१ आॅक्टोबर-२०२३), अन्न व आैषध प्रशासकीय सेवा, गट -ब : १९४ (मुख्य परीक्षा२८ आॅक्टोबर-२०२३)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.