आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वाघाडी गावाच्या शिवारात कारचा अपघात; अपघातामुळे 6 लाखांचा अफू वाहनात आढळला

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाघाडी गावाच्या शिवारात कारचा अपघात झाल्यानंतर त्यात सुमारे १५० किलो अफूची वाळलेली बोंड मिळून आली. या प्रकरणी एकाविरुध्द सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरुन जाणारी कार ( एमएच १८, बीसी ०२०५ ) मधून अफूच्या बोंडची वाहतूक केली जात होती. ही कार सुसाट वेगाने निघाली होती. वाघाडी गावाच्या फाट्याजवळ या कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत चालकाने सुसाट वेगाने वाहन नेले.

सरवड फाट्यापासून वळण घेत हे वाहन बोरीस, मेहेरगावकडून कावठीकडे जात असताना या वाहनाचा अपघात झाला. या वेळी वाहन चालक महेंद्र फौजीसिंग राजपुरोहित (वय २८, रा. राजस्थान, हमु नंदुरबार) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतल्यावर त्यात ८ पोत्यांमध्ये भरलेली सुमारे १४४.४८ ग्रॅम अफूची बोंड मिळून आली. कारवाईत सुमारे ६ लाखांची अफूची बोंड, वाहन मोबाइलसह एकूण १३ लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...