आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळे:सचिन वाझे वापरत असलेली ‘ती’ कार धुळ्यातून विकलेली, फेब्रुवारीत ऑनलाइन पोर्टलवरून विकली, मालकाचे स्पष्टीकरण

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या वाहनांमध्ये ही मर्सडीज कार दिसली होती.

सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सायंकाळी जप्त केलेली मर्सिडीज कार धुळे पासिंगची असून ती मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर असल्याचे दिसते आहे. दरम्यान, महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी ती विकत घेतली होती आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती आॅनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर स्फोटके ठेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या वाहनांमध्ये ही मर्सडीज कार दिसली होती. हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणाचा तपास करणारी एनआयए या कारच्या शोधात होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी ती मुंबईतून एका पार्किंगमधून जप्त केली. तिचा क्रमांक एमएच १८ बीआर ९०९५ असा आहे.

बातम्या आणखी आहेत...