आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिरपूर येथे दगडफेकप्रकरणी 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; दुचाकीचा धक्का लागल्यावरून वाद

शिरपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कुंभारटेक पोलिस चौकी परिसरात दुकानावर आणि परिसरात दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ३१ जणांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर येथे बोहरा मशिदीजवळ मिरवणूक आल्यावर गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुचाकीचा धक्का लागल्यावरून वाद झाला होता, एक गट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेला होता. त्यांची तक्रार पोलिस दप्तरी नोंदवून घेत असतानाच पोलिस स्टेशनच्या आवारात आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दीतील नागरिक आरडाओरड करीत असताना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शांततेचे आवाहन करीत नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितले. या वेळी ‘कुंभारटेककडे चला’ असे म्हणत गर्दीतील नागरिक दुचाकी घेऊन रवाना झाले. त्यानंतर थोड्याच वेळात कुंभारटेक येथील पोलिस चौकी परिसरात दुकानावर काही जणांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दगड,विटांचा खच याठिकाणी होता. पोलिसांना पाहून दगडफेक करणारे पळून गेले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे दगडफेक करणारे कोण होते. त्यांना शोधून काढण्यात आले. दगडफेक करीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिस नाईक हेमंत नाईक यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आवेश ईसा शेख उर्फ बीडी, जुनेद मिर्झा, साबीर शेख, सय्यद अमीर, जुनैद, आवेस शेख मिर्झा, मुदस्सर शेख, रिझवान शेख, रेहान शेख, अवेझ, कासीब शेख, साबीर बुच्या तेली, मोहसीन रऊफ शेख, विलास रऊफ शेख रफिक कुकर वाल्याचा मुलगा, मोहीद्दीन खुदाबक्ष तेली (सर्व रा. शिरपूर) यांच्या विरोधात भादंवि कलम ३३६, ४२७, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायद्याचे कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...