आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे दाखल झालेल्या सर्व १७ हजार प्रस्ताव ५ जूनपर्यंत निकाली काढण्यात आले आहेत.
यामुळे बारावीचा निकाल जाहीर हाेण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात जातवैधता प्रमाणपत्र हाती आहेत. ज्या प्रकरणात त्रुटी आहेत. त्यांची पूर्तता विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्रुटीचे प्रकरणेदेखील निकाली निघणार आहेत.
बारावीनंतर विद्यार्थी औषधनिर्माण पदवी, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी यासह शिक्षणशास्त्र, विधी सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. याकरिता बारावीचे शिक्षण घेत असतानाच जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. समितीकडे दाखल प्रस्तावांची छाननी करून तीन महिन्याच्या आत समितीने हे प्रस्ताव निकाली काढावे, असा प्रघात आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची मुदतीत छाननी करून एक महिन्याच्या आत प्रकरणे निकाली काढले आहेत. तसेच मोठ्या महाविद्यालयात कॅम्प घेणार आहेत.
फसवणूक टाळावी; अडचणी असल्यास संपर्क साधावा
जातपडताळणीसाठी अॉनलाइन प्रस्ताव सादर करण्यासह ऑनलाइन त्रुटी पूर्ण करण्याची संधी असते. मात्र कार्यालयाच्या बाहेर काही विद्यार्थ्यांच्या फसगत होत असल्याच्या तक्रारी येतात. यामुळे विद्यार्थी व पालकांनी जातपडताळणीसाठी अर्ज दाखल करताना अर्जावर टाकलेला जातीचा प्रवर्ग, ई-मेल अॅड्रेस, मोबाइल क्रमांक यांची पडताळणी करून टाकावा. अडचणी असल्यास खासगी व्यक्तीशी संपर्क न साधता थेट जातपडताळणी समितीशी संपर्क साधावा, फसवणूक टाळणे शक्य होईल.
-राकेश महाजन, उपायुक्त, जिल्हा जातपडताळणी समिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.