आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; 2 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

शिरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर-शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील कर्मवीर पेट्रोल पंपासमोर जनावरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले. या कारवाईत २ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांचे पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. त्या वेळी संशयावरून वाहन एमएच-०४-बीयू-६३७ थांबवले. यावेळी या वाहनात ८ जनावरे आढळली. त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला. पोलिस कॉन्स्टेबल स्वप्निल बांगर यांच्या फिर्यादीवरून चालक आबिद पायलट रा. मच्छीबाजार धुळे व सहचालक इम्रान मोहम्मद मुस्लिम अन्सारी रा. मौलवीगंज धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.