आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी साळवे खून खटला:सीसीटीव्ही फुटेज, हत्यार; मारेकऱ्यांनाही ओळखले

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील चंदननगरमध्ये राहणाऱ्या सनी साळवे खून खटल्याचे सीसीटीव्ही फुटेज, हत्यार अन‌् मारेकऱ्यांना सागर साळवे याने बुधवारी न्यायालयात ओळखले. दोन सत्रात सुमारे तीन तास या खटल्याचे कामकाज झाले. या वेळी सरतपासणीसह संशयितांच्या वकिलाकडून सागरची उलट तपासणी झाली. खटल्याचे पुढील कामकाज १५ नोव्हेंबरला होणार आहे.

सनी साळवे या विद्यार्थ्याचा सशस्त्र हल्ला करून खून झाला होता. ही घटना १८ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. या खटल्याचे न्यायालयात कामकाज सुरू झाले आहे. न्या. एम. जी. चव्हाण यांच्या समक्ष बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजता खटल्याच्या कामाला सुरुवात झाली. या खटल्यातील तक्रारदार तथा मृत सनी याचा चुलत भाऊ सागर राजेंद्र साळवे याची सरतपासणी घेण्यात आली.

दुपारी २ वाजेपर्यंत साक्ष झाली. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. या वेळी संशयिताच्या वकिलांनी सागरची उलटतपासणी केली. दुपारी साडेचारपर्यंत कामकाज झाले. सागरने सनीवर हल्ला होतांना सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच संशयितांना ओळखले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्यामकांत पाटील काम पाहत असून त्यांना अॅड. विशाल साळवे सहकार्य करत आहे. सागरची अपूर्ण असलेली उलटतपासणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...