आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता समिती बैठक:सण, उत्सव कायदे पाळून शांततेत साजरे करा; प्रांताधिकारी डॉ .चेतनसिंग गिरासे यांचे शहाद्यात आवाहन

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाण्याच्या आवारात येणारे विविध सण व उत्सव, महापुरुषांच्या जयंती शांततेत साजरा करण्यासाठी शांतता समितीची बैठक झाली. प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी हे आवाहन केले. व्यासपीठावर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, विद्युत वितरण विभागाचे शाखा अभियंता जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेलटे, आरटीओ सचिन सोनवणे, नगरपालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, उपस्थित होते. राम नवमी, क्रांतिवीर खाज्या नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा जोतिराव फुले जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती येत असल्याने शिवाय रमजान महिना सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्था संदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती.

प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त मकरंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, प्रा. लियाकत अली सय्यद, अजय शर्मा, अनिल कुवर, शेख मेहमूद यांनी विचार मांडले. या बैठकीला रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, विश्व हिंदू परिषदेचे अजय शर्मा, श्रीराम नवमी उत्सव समितीचे नरेश वाडिले, बजरंग दलाचे राजा साळी, भाजपचे पंकज सोनार, माजी नगरसेवक के.डी. पाटील, माजी नगरसेवक अशोक मुकरंदे, तैलिक समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, रमाशंकर माळी, गिरीश पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे तालुका सचिव सुनील गायकवाड, माजी नगरसेवक दादा जगदेव, मुनेश जगदेव, प्रा. नेत्रदीपक कुवर, प्रा. लियाकत सय्यद, माजी प्राचार्य डॉ. खलिल, आरिफ पिंजारीसह शांतता कमिटी सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले. तर आभार पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी मानले. अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...