आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:आनंदोत्सव साजरा; आमशा पाडवींना उमेदवारी खापरला जल्लोष

धूळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा

शिवसेनेने अक्कलकुव्यातील एका सामान्य निष्ठावान शिवसैनिकाला विधान परिषदेची उमेदवारी निश्चित करून आदिवासी भागाला न्याय दिल्याबद्दल खापर येथे शिवसैनिकांकडून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रचंड जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विधान परिषदेवर नंदुरबार जिल्ह्यातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी दिल्याने आमशा पाडवी यांच्या रूपात शिवसेनेला जिल्ह्यात पहिला आमदार मिळणार आहे.

आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने खापर येथे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात येत आहे. शिवसेनेचे युवा जिल्हाधिकारी ललित जाट, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, जगदीश चित्रकथी, जोलू वळवी, राजाराम पाडवी, किशोर चौधरी, विजय पटेल, रवी पाडवी, योगेश सोनार, अक्षय सोनार, अजय पटेल, भाऊसिंग वसावे, संतोष पवार, जसराज पवार, राजेंद्र टाक, ईश्वर चौधरी, नासीर मकरानी उपस्थित होते.

शहादा
जिल्हा शिवसेनाप्रमुख आमशा पाडवी यांनी दिनांक आठ जून रोजी शिवसेनेचे मुख्य नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दुपारी दाेन वाजता विधान भवनात उमेदवारी दाखल केली. त्यानंतर शहादा येथे शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.

तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र लोहार, शहर प्रमुख रोहन माळी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, तालुका संघटक गणेश चित्रकथे, उत्तम पाटील, कादीर शेख, भगवान अलकारी, सागर चौधरी, दिलीप पाटील, डॉ. सागर पाटील, बापू चौधरी, माजी शहर प्रमुख विजय भामरे, अविनाश पाटील, गुलाब सुतार, मुरली वळवी जल्लाेषात सहभागी झाले होते. निष्ठावंत विश्वासू कार्यकर्ते आमशा पाडवी यांना शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकरी शेतमजूर, सर्वसामान्यांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया अरुण चौधरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...