आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. निवडणूक आल्यावर दरवाढ रोखणे व निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दरवाढ सुरू करणे हे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली. आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महागाई वाढवणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे महागाई वाढल्याने काँग्रेसतर्फे आंदोलन झाले. आंदोलनात माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, सहप्रभारी प्रदीप राव, आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार शरद पाटील, सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, अॅड. मोहन पाटील, डॉ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, डॉ. अनिल भामरे, रणजित पावरा, साहेबराव खैरनार, इंटकचे अध्यक्ष प्रमोद सिसोदे, डॉ. दत्ता परदेशी, प्रकाश पाटील, आबा मुंडे, महेंद्र पाटील, प्रमोद बोरसे, समद शेख, प्रवीण पाटील, अमोल बोरसे, भाईदास धनगर, देवेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, उत्तमराव पाटील, नंदूभाऊ खैरनार, प्रज्योत देसले, किशोर पाटील, पी. एस. पाटील, अॅड. मोहन पाटील, उत्तमराव माळी, मनोहर पाटील, अशोक सुडके, रावसाहेब पाटील, अरुण पाटील, बापू खैरनार, कुलदिप निकम, हसन पठाण, संभाजी गवळी, बानूबाई शिरसाठ, दिनकर देवरे, डॉ. विजय देवरे, दिलीप बिरारी, छोटूभाऊ चौधरी, भटू चौधरी, सरपंच पांडुरंग मोरे, कीर्तिमंत कौठळकर, हर्षल साळुंके, ज्ञानेश्वर मराठे, प्रदेश सरचिटणीस पंकज चव्हाण, लंकेश पाटील, जितेंद्र पवार, शकील अहमद, मुकुंद कोळवले, सतीश रवंदळे, ऋषी ठाकरे, किरण नगराळे, दिनेश देसले, अशोक राजपूत, अविनाश महाजन, मनोहर पाटील, शिवाजी अहिरे, प्रवीण माळी आदी सहभागी झाले. या वेळी जिल्हाध्यक्ष श्याम सनेर म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारमुळे महागाई वाढली आहे. सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याने काम सरकारने केले असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.