आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेत बदल करण्यात यावा:खान्देश एक्स्प्रेस दररोज करून वेळेत बदल करा; आमदार रावल यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली मागणी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशातून थेट मुंबईला जोडणारी पश्चिम मार्गावरील महत्त्वाची गाडी असलेली खान्देश एक्स्प्रेस ही आठवड्यात केवळ ३ दिवस धावते. या गाडीला मिळालेला प्रतिसाद पाहता ती दररोज करण्यात यावी. तसेच तिच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. आमदार रावल यांनी दिल्ली रेल्वे मंत्रालयात जाऊन रेल्वेमंत्री यांची भेट घेतली.

या वेळी सुरत ते भुसावळ रेल्वे मार्गावरील समस्यांचे निवेदनदेखील दिले. त्यात खान्देश एक्स्प्रेस ही गाडी बांद्रा येथून रात्री १२ वाजता सुटते. सकाळी ११ वाजता भुसावळ येथे पोहाेचते तर सायंकाळी ५ वाजता सुटून पहाटे ४ वाजता बांद्रा येथे पोहाेचते. हा सर्व वेळ सयुक्तिक नाही. म्हणून रात्री १२ ऐवजी १० ला सुटावी म्हणजे सकाळी ही गाडी लवकर खान्देशात पोहाेचेल. तर भुसावळहून सायंकाळी ५ ऐवजी ७ वाजता सुटली तर सकाळी ६ वाजता मुंबईत पोहोचेल. ही वेळ सयुक्तिक राहील. या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे खान्देशातील जनतेला स्वस्तात मुंबई गाठणे सोयीचे होणार असल्याने गाडी रोज सोडावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...