आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकाराला चाप:अगोदर रस्त्याच्या कामांची गुणवत्ता‎ तपासावी; बिल देण्याची घाई नको‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रस्त्यांची कामे करण्यासाठी राज्य‎ सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला‎ जातो आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याचे काम‎ गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. महापालिका‎ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. कामाची‎ गुणवत्ता तपासल्यानंतर याविषयीचा‎ अहवाल स्थायी समितीसमोर ठेवावा.‎ तोपर्यंत ठेकेदारांना बिल देण्याची घाई करू‎ नये, अशी सूचना महापालिका स्थायी‎ समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली.‎ बैठकीत ५४ कोटींतून होणाऱ्या रस्त्यांचे‎ काम करण्यासाठी प्राप्त झालेल्या दरांना‎ मंजुरी देण्यात आली.‎ महापालिका सभागृहात सोमवारी दुपारी‎ चार वाजता बैठक झाली. सभापती किरण‎ कुलेवार, आयुक्त देविदास टेकाळे,‎ नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह‎ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक‎ सुनील बैसाणे म्हणाले की, प्रत्येक‎ रस्त्याच्या कामाचे मूल्यमापन झाले‎ पाहिजे. निविदेतील अटी, शर्तीनुसार काम‎ झाले की नाही यासह कामाच्या गुणवत्तेची‎ तपासणी होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या‎ कामासाठी भाजपने कोट्यवधी रुपये मंजूर‎ करून आणले आहे. या निधीचा योग्य‎ विनियोग व्हावा. ठेकेदार रस्त्यांची काम‎ मनमानी पद्धतीने करतात.

या प्रकाराला‎ चाप लावावा.ठेकेदाराला बिल देण्यापूर्वी अहवाल स्थायी समितीच्या‎ सभेत ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली.‎ नगरसेवक नरेश चौधरी यांनीही रस्त्यांचे‎ काम दर्जेदार झाले पाहिजे. तक्रारीला‎ संधी मिळता कामा नये, अशी मागणी‎ केली. सभेच्या विषय पत्रिकेवर‎ चर्चेसाठी ६४ रस्त्याच्या कामांचे दर‎ मंजूर करण्याचे दोन विषय होते.‎ चर्चेनंतर हे विषय मंजूर झाले.‎

मनपात नागरिकांसाठी पाण्याची सोयच नाही
महापालिकेत अनेक नागरिक कामासाठी येतात. पण नागरिकांसाठी‎ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. मनपात असलेला वॉटर कुुलरही‎ बंद आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वॉटर कुलर तातडीने दुरुस्त‎ करून सुरू करावा, अशी सूचना सभापती कुलेवार यांनी केली.‎ त्यानुसार वॉटर कुलरची दुरुस्त करण्याची सूचना झाली.‎

कोरोनाची लसच उपलब्ध नाही
नगरसेवक सुनील बैसाणे म्हणाले की, शहरात कोरोनाचे‎ दोन रुग्ण आढळले आहे. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी‎ आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी‎ त्यांनी केली. या वेेळी नगरसेविका फातेमा अन्सारी यांनी‎ हज यात्रेकरूंना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी‎ मागणी केली. त्यावर आरोग्याधिकाऱ्यांनी राज्यात लस‎ उपलब्ध नसल्याचे सांगितले. याविषयावर बैठक होईल.‎

अधिकारी पुन्हा होते अनुपस्थित‎
स्थायी समितीच्या‎ बैठकीला सर्व‎ अधिकाऱ्यांनी उपस्थित‎ राहावे, अशी सूचना‎ सभापती किरण कुलेवार‎ यांनी केली होती.‎ त्यानंतरही सोमवारी‎ झालेल्या बैठकीला‎ लेखाधिकारी गजानन‎ पाटील उपस्थित नव्हते.‎ याविषयी विचारणा‎ केल्यावर आयुक्त‎ देविदास टेकाळे यांनी‎ काही कारणामुळे येऊ‎ शकत नाही असा मेजेस‎ लेखाधिकाऱ्यांनी‎ पाठवला असल्याचे‎ सांगितले. त्यावर‎ सभापती कुलेवार यांनी‎ नियमाप्रमाणे हे योग्य‎ आहे का अशी विचारणा‎ केली. त्यावर आयुक्त‎ देविदास टेकाळे यांनी‎ लेखाधिकाऱ्यांकडून‎ लेखी खुलासा घेण्यात‎ येईल असे स्पष्ट केले.‎

आता तक्रारी निवारणासाठी कर्मचारी नेमणार‎
शहरातील नागरिकांच्या मूलभूत‎ सोयी सुविधासंदर्भात विविध‎ तक्रारी असतात. या तक्रारी‎ स्वीकारण्यासाठी एका‎ कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात‎ यावी, अशी सूचना सभापती‎ किरण कुलेवार यांनी आयुक्त‎ टेकाळे यांना केली. तसेच‎ कोणतीही तक्रार दोन दिवसांत‎ सुटली पाहिजे. याविषयीचा‎ अहवाल स्थायी समितीच्या‎ सभेत सादर करावा, अशी‎ सूचना सभापती किरण कुलेवार‎ यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...