आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:सायकल रॅलीचे औक्षण करत स्वागत ; मुंबईहून पोलिस अधिकारी, कर्मचारी दिल्लीकडे

सोनगीर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी सायकलने मुंबईहून दिल्लीला निघाले आहे. या रॅलीचे गावात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पोलिस दलातर्फे मुंबईतील पोलिस महासंचालक कार्यालय ते दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत मुंबई येथील राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपआयुक्त धनंंजय येरळेे, धुळ्याचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद पाटील, दिलीप खोंडेे, अनिल जाधव, जितेंद्र परदेशी, पोलिस हवालदार प्रकाश माळी, शिवाजी हावळे, मनोज भंडारी, आदी सहभागी झाले. ही रॅली गुरुवारी सायंकाळी सोनगीर येथे आली.

आनंदवन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे स्वागत केले. आरीफ शहा, तौसिफ शेख, मौसीन शेख, बिस्मिल्ला खाँ, निसार शाह, शाहफेहत शाह, याकुब पठाण, इद्रिस शेख, कलीम शेख, निसार पठाण, लतीफ पठाण, फैजाण शेख, फैजल शहा, वसिम शहा, गोपाल मोरे आदी उपस्थित हाेते. दरम्यान, धुळे तालुक्यातील सरवड फाट्यावर रॅलीत सहभागी झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या. रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

महामार्गावरील देवभाने, सरवड फाटा येथे स्वागत
रॅलीचे देवभाने फाटा, सरवड फाटा आदी ठिकाणी स्वागत झाले. सरवड फाट्यावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती धरती देवरे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अपर उपआयुक्त राज्य शरद पाटील, दिलीप खोंडे, अनिल जाधव, जितेंद्र परदेशी, प्रकाश माळी, शिवाजी हाबळे, मनोज भंडारी यांचे सभापती धरती देवरे यांनी औक्षण करून स्वागत केले. देवभाने फाट्यावर कापडणे जिभाऊ माळी, सुशील माळी, काशिनाथ भील आदींनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...