आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथम क्रमांक पटकावत यश:निबंध लेखन स्पर्धेत चेतन देवरे यास प्रथम क्रमांक

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय, शहादातर्फे राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात चेतन जगतराव देवरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावत यश मिळवले.

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने ‘स्वातंत्र्योत्तर काळातील कृषी तंत्रज्ञानातील प्रगती’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आॅनलाइन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक चेतन जगतराव देवरे (के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा), द्वितीय उमेश देविदास खत्री (कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा), तृतीय शुभम अशोक डुबे (डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय) यांनी मिळवला. निबंध स्पर्धेचे आयोजन प्रा.डॉ.बी.सी.चौधरी यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.डी.एस.सूर्यवंशी यांनी काम पाहिले. प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा झाली.

बातम्या आणखी आहेत...