आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मीयांना समान वागणूक देत माणसाला माणूस म्हणून वागवले. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सुराज्य होते. नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज होत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अबलेच्या शीलाचे रक्षण केले. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केल्याचे मत गंगामाई कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
शिवजयंतीनिमित्त येथील सेंट अॅन्स कथोलिक चर्चच्या सभागृहात सर्वधर्म संघातर्फे कार्यक्रम झाला. त्या वेळी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य आणि संवैधानिक भारतीय प्रजासत्ताक या विषयावर ते बोलत होते. डाॅ. विजयचंद्र जाधव अध्यक्षस्थानी होते. नरेंद्र वडगावकर, ॲड. विनोद बोरसे, डाॅ. शरद वाणी, एल. आर. राव, ज्योत्स्ना खैरनार, हाजी अब्दुल करीम न्हावकर, मुरलीधर पांडे, जयश्री शहा, ॲड. आसिफ शेख, दत्तात्रय कल्याणकर, शंकर पवार, श्रीकृष्ण बेडसे, प्रकाश भंडारी आदी उपस्थित हाेते. प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज गनिमी काव्याचे जनक होते.
त्यांनी बलाढ्य मोगल सैन्याचा मुकाबला करण्यासाठी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन परिस्थितीनुसार युद्धनीतीचा अवलंब केल्याचे ते म्हणाले. डाॅ. विजयचंद्र जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सतराव्या शतकात झालेला एक चमत्कार होता. त्यांनी स्वराज्यात संवैधानिक व्यवस्था राबवल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे प्रत्येकाने वाचन करावे. त्याचबरोबर त्यांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. ॲड. एम. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शेख हुसेन गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राम जाधव यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.