आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:कलेक्टर कार्यालयातही मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने आता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू होणार आहे. या कक्षाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर असेल.विभागीय आयुक्त कार्यालयात जानेवारी २०२० पासून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यरत झाला आहे. पण आता जिल्हा पातळीवर कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, ग्रामीण भागातील प्रश्न तातडीने सुटावे या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले आहे.

त्यानुसार या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी असतील. कक्षात एक नायब तहसीलदार व लिपिकाची नियुक्ती होणार आहे. कक्षात प्रामुख्याने पुरवठा, करमणूक शाखेत अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. या कक्षात मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्वीकारण्यात येतील. तसेच संबंधितांना पोहच पावती दिली जाईल. त्याचबरोबर आलेली तक्रार तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कक्षाच्या कामाचा आढावा घेतील.

बातम्या आणखी आहेत...