आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिराचे उद्घाटन:शिंदखेड्यात बालआरोग्य तपासणी शिबिर

शिंदखेडा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण राजाराम माळी यांनी वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च टाळून लहान मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेतले. शिबिरात दीडशे बालकांची तपासणी करण्यात आली. हे शिबिर डॉ. हितेंद्र पवार यांच्या सहकार्याने झाले. शिबिराचे उद्घाटन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे व ज्येष्ठ समाजसेवक दयाराम माळी यांनी केले.

या वेळी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, युवराज माळी, प्रा. दीपक माळी, सुनंदा माळी, अॅड. विनोद पाटील, अॅड. सुभाष जाधव, तुकाराम पाटील, राजू पहाडी, सोमनाथ जाधव, राजेंद्र माळी, संजयकुमार महाजन, संजय मंगा माळी, कुणाल जाधव, चंद्रसिंग परदेशी आदी उपस्थित होते. डॉ. हितेंद्र पवार, संदीप गिरासे, नीलेश सोनवणे, इरफान पठाण यांनी शिबिराचे कामकाज पाहिले. शिबिरात वजन न वाढणे, आहार, खोकला, ताप, सर्दी, कावीळ, बालदमा, डायरिया, तापात झटके येणे आदी आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी संत सावता व्यायामशाळा, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीराम मारुती भजनी मंडळ, बालगोपाल भजनी मंडळ, सावित्रीबाई फुले उत्सव समिती, महात्मा फुले प्रतिष्ठान आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...