आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले असून, त्यातच दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. न्यूमोनियासह अन्य श्वसन मार्गाचे विकार वाढले आहे. तसेच दहा ते पंधरा दिवसांपासून लहान मुलांमध्ये गाल फुगी, कांजण्यांचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय बालदम्याचे रुग्णही आढळत आहे.
तसेच पूर्वीच्या तुलनेत व्हायरल डायरियाचे रुग्ण आढळून येत आहे. थंडीपूर्वी हे प्रमाण नगण्य होते. आता रोजच्या ओपीडीत या आजारांचे रुग्ण १० ते १२ येता आहेत . जिल्ह्यासह शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच मंगळवारपासून गारठा वाढला आहे. मध्यंतरी दोन दिवस तापमान ७ अंशांवर आले होते. शीत लहरींमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असल्याची स्थिती आहे.
थंडीचे प्रमाण वाढल्याने दमा, फुप्फुसाच्या आजाराचे रुग्ण वाढले आहे. न्यूमोनियाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत जास्त आहे. तसेच विषाणूजन्यआजार ही वाढता आहे. त्यामुळे दमा व फुुप्फुसाचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण संतुलितठेवावे. त्यामुळे डिहायड्रेशन होण्यासह हार्टअॅटक व ब्रेनस्ट्रोकचा धोका कमी होतो. डॉ. संजय संघवी, फिजिनियन
पाणी पिण्याचे प्रमाण संतुलित ठेवल्यास होईल फायदा
सर्दी, खोकल्यासह लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण जास्त आढळून येते आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अस्थम्याचा त्रास होतो आहे. काही बालकांमध्ये कान फुटण्याची समस्या वाढली आहे. न्यूमोनिया, श्वसन विकार, फ्लू, सर्दी खोकल्याच्या आजाराचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वाढल्याची माहिती खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दिली. आता काही प्रमाणात कमी झालेली थंडी पुढील आठवड्यात पुन्हा परतण्याची शक्यता आहे. साेमवार ते बुधवारपर्यंत थंडी वाढू शकते.
त्वचा शुष्क होण्याचे प्रमाण
वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, बाल दम्याचे रुग्ण वाढत आहे. कांजण्या, गालफुगीची साथ आहे. व्हायरल डायरिया आढळून येतो आहे. काही मुलांच्या अंगावर रॅशेस येत आहे. हा त्रास टाळण्यासाठी लहान मुलांना गरम कपडे घालावे. मुलांना थंडीत नेणे टाळावे. या दिवसात त्वचा शुष्क होत असल्याने बॉडी लोशनचा वापर करावा. प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशी माहिती शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिनव दरवडे यांनी दिली.
पिकांनाही बसतोय फटका
धुक्यामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढेल. तसेच केळीवर करपा रोगाचाा धोका वाढला आहे. गव्हावर बुरशीजन्य आजारांची लागण होण्याचा धोका आहे. कांद्यासह भुईमुगावर मावा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. घाटेअाळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हेल्युलर गोळीसह एकरी दहा कामगंध सापळे लावावे. तसेच कोरोजोन १० लिटर पाण्यात १० मिली प्रमाणात मिसळून त्याची फवारणी करावी, असा सल्ला जिल्हा कृषी विकास अधिकारी यू. टी. गिरासे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.