आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला दिवस आनंदाचा:पटेल प्राथमिक शाळेत सेल्फी पॉइंटवर लुटला मुलांनी आनंद; विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

शिरपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची वाजत-गाजत शाळेचा आवारात मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेत सेल्फी पॉइंटचा आनंद घेत पालकांसोबत फोटो काढले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.

बालवाडी वर्गातील प्रणाली अहिरे या विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, बालाजी सेवा समितीच्या चारू पाटील, दिव्या जैन, फरिदा बोहरी, टी. एन. जाधव, मुख्याध्यापक सी. डी. पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...